‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सव !

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सायंकाळी ५ वाजता श्रीशिवतीर्थ, मारुति चौक येथून शोभायात्रा प्रारंभ, सायंकाळी ६.४५ वाजता श्री पशुपतीनाथ मंदिर येथे आरती-पाळणा आणि सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.

अवेळी पडलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात टोमॅटो, द्राक्षे आणि फळबागा यांची मोठी हानी !

काही ठराविक अंतरानंतर सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. बाजारात शेतमालाला उठाव नाही आणि त्यातच होणारी हानी शेतकऱ्याची आर्थिक घडी तोडणारी आहे.

नियम मोडून गैरवर्तन करणाऱ्या २ धर्मांधांना अटक !

येथील बैलबाजार परिसरातील हिंद पेट्रोलपंपावर १५ एप्रिलला दुपारी २ वाजता मुकलीस मोहसीन फक्की, जावेद असमत डॉन हे दोघे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तेथील कामगाराने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली आणि पेट्रोल ओतणाऱ्या पाईपचा ‘नोझल’ खेचला.

मुंबईत ३ आतंकवादी घुसल्याची खोटी माहिती देणार्‍या धर्मांधाला नगर येथून अटक !

प्रथम खोटी माहिती देऊन एक दिवस खरोखरच आतंकवाद्यांना घुसण्यासाठी साहाय्य करायलाही हे धर्मांध मागे-पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

रुग्णालयातील आगीच्या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना मानवाधिकार आयोगाची कारणे दाखवा नोटीस !

वसई-विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये वातानुकूलित यंत्रामुळे अतीदक्षता विभागात २३ एप्रिल २०२१ या दिवशी लागलेल्या आगीमध्ये १९ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

भूमीच्या वादातून थोरल्या भावाकडून सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली. 

आर्.बी.एल्. बँकेद्वारे कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप !

आर्.बी.एल्. बँकेने त्यांच्या सी.एस्.आर्. उपक्रम – उमीद १०००च्या अंतर्गत कोल्हापुरातील १०१ गरजू मुलींना सायकल आणि शालोपयोगी वस्तू यांचे वाटप केले. हे वाटप जिल्हा परिषद येथे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

मिरज येथील श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवास प्रारंभ !

१९ एप्रिल या दिवशी पू. कौस्तुभबुवा रामदासी यांचे संत वेणास्वामी महानिर्याण कीर्तन होईल. हे सर्व कार्यक्रम ब्राह्मणपुरी येथील श्री संत वेणास्वामी मठ येथे होत आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.

अमरावती येथे पोलिसांनी ५२ गोवंशियांची तस्करी थांबवली !

केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !

पुणे महापालिकेतील १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे स्थानांतर ! 

येथील महापालिकेमध्ये वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणार्‍या १३२ कनिष्ठ अभियंत्यांचे तडकाफडकी स्थानांतर करण्यात आले. त्यामध्ये स्थापत्य पदावरील १०९, विद्युत् पदावरील १७ आणि यांत्रिकी पदावरील ६ अभियंत्यांचा समावेश आहे.