‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सव !

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

सांगली, १६ एप्रिल (वार्ता.) – ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सायंकाळी ५ वाजता श्रीशिवतीर्थ, मारुति चौक येथून शोभायात्रा प्रारंभ, सायंकाळी ६.४५ वाजता श्री पशुपतीनाथ मंदिर येथे आरती-पाळणा आणि सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश ठाणेदार, शहराध्यक्ष श्री. विशाळ जेऊरकर यांनी केले आहे.