कात्रज (पुणे) परिसरामध्ये धोकादायक इमारतीमध्ये भरतेय शाळा !

वर्ष २०१८-१९ मध्ये ही इमारत ‘धोकादायक’ म्हणून अहवाल जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्यात आला आहे; परंतु त्याच ‘धोकादायक’ इमारतीमध्ये शाळा भरत असून विद्यार्थी भीतीच्या छायेतच शिक्षण घेत आहेत

ठाणे येथे पोलीस भरतीच्या परीक्षेत अपप्रकार करणार्‍या परीक्षार्थीला अटक

अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! असे नकली परीक्षार्थी बसवून उत्तीर्ण होणारे पोलीस काय कामाचे ?

पुणे येथील नरपतगिरी चौकातील साईबाबा मंदिरातून दानपेटीची चोरी !

उत्सवांच्या दिवशी मंदिरांमध्ये चोरी होणे, हे हिंदूंची मंदिरे असुरक्षित असल्याचे द्योतक !

महावितरण कार्यालयाचा वीजदेयकातील भोंगळ कारभार !

ग्राहकाला अधिक रकमेचे देयक पाठवायचे आणि पुन्हा ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकालाच हेलपाटे मारायला लावणे हे चीड आणणारे आहे. आस्थापनाच्या या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे !

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी ३२ जणांवर गुन्हा नोंद !

अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर केणीद्वारे अवैध वाळू उपसा आणि साठा करणार्‍या ३२ जणांवर गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पालघर किनारपट्टीवरील बोटीत पाकिस्तानी नागरिक नसल्याचे स्पष्टीकरण !

 बोटीतील १५ खलाशांच्या आधारकार्डची पडताळणी केली असून त्यात कुणीही पाकिस्तानी नागरिक नाही. याविषयीचे स्पष्टीकरण बोटीला अर्थसाहाय्य करणार्‍या ‘उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थे’ने दिले आहे.

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री करणार्‍या ३ धर्मांधांसह एकाला अटक !

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधील गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे.

खडकवासला (पुणे) धरणालगत सापडले गावठी दारूचे ४० बॅरेल !

एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू कशी येते ? हे सुरक्षा व्यवस्थेला का समजत नाही ? याचा शोध घेणे आवश्यक आहे !

सोलापूर येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद

नेहमीच महिलांवर अत्याचार करणार्‍यांमध्ये धर्मांध पुढे असतात, यातून त्यांची वासनांध मानसिकता लक्षात येते ! !

वैराटगड (जिल्हा सातारा) येथे आढळून आली पुरातन नाणी !

कराड तालुक्यातील वैराटगड येथे २८ मार्चला स्वच्छता करतांना शिवप्रेमींना पुरातन नाणी आढळून आल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे.