पाकमध्ये जमावाकडून पोलीस ठाण्यात घुसून ईशनिंदेच्या प्रकरणातील आरोपीची हत्या !

ईशनिंदेच्या प्रकरणात हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले व आरोपीला निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली.

तुर्कीये आणि सीरिया येथे भूकंपबळींची संख्या २८ सहस्रांहून अधिक !

तुर्कस्तानच्या भूकंपात विजय कुमार गौड नावाच्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते; परंतु त्यांच्या हातावरील ‘ॐ’ च्या ‘टॅटू’मुळे त्यांची ओळख पटली.

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित !

भारत आणि हिंदू यांचा सातत्याने अपमान करणार्‍या बीबीसीवर भारतातील नागरिकांनीही ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे बहिष्कार घालण्याचा रोखठोक बाणा अंगीकारणे अपेक्षित आहे !

मोदी युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांचे मन वळवू शकतात ! – अमेरिका

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध संपवण्यासाठी भारताचे पंतप्रधान मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मन वळवू शकतात, असा दावा अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’चे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केले.

अमेरिकेत आता दिसली हवेत उडणारी वस्तू !

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी हेरगिरी करणारा फुगा आढळून आल्यानंतर आता अलास्का येथे पुन्हा हवेत उडणारी एक वस्तू दिसली. ही वस्तू हवेत ४० सहस्र फूट उंचीवर उडत होती. त्यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ही वस्तू पाडली.

आफ्रिका खंडातील १३ देशांमध्ये सैनिकी तळ बनवण्याचा चीनचा प्रयत्न !

आफ्रिका खंडातील देशांना कर्ज देऊन त्यांना आर्थिक गुलाम बनवण्याच्या सिद्धतेत असणार्‍या चीनने आता तेथे सैनिकी तळ स्थापन करण्याची सिद्धता केली आहे. यासाठी चीनने १३ देशांची निवड केली आहे.

सूर्याचा एक मोठा भाग निखळून पडली भेग !

या घटनेविषयी जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. काही अभ्‍यासकांचे यावर म्‍हणणे आहे की, ही घटना अनपेक्षित नाही. सौरचक्राच्‍या ११ वर्षांच्‍या कालावधीत अशी घटना सौरचक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते.

कुराण जाळणार्‍या स्‍विडनऐवजी अल्लाकडून तुर्कीयेला शिक्षा ! – तस्‍लिमा नसरीन

इस्‍लामवादी म्‍हणत होते, ‘अल्ला स्‍विडनला शिक्षा देईल’; कारण स्‍विडनमधील लोक कुराण जाळत होते; पण त्‍याऐवजी अल्लाने तुर्कीयेला शिक्षा दिली.

तुर्कीये आणि सीरिया यांच्‍यानंतर पाकिस्‍तानात भूकंप येण्‍याच्‍या अफवेमुळे भीतीचे वातावरण

तुर्कीये आणि सीरिया यांच्‍यानंतर आता अफगाणिस्‍तान, पाकिस्‍तान आणि भारत यांचा क्रमांक आहे, असे भाकीत नॉर्वे येथील ‘सोलर सिस्‍टम ज्‍यॉमेट्री सर्व्‍हे’या संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ फ्रँक होगरबीट्‍स यांनी केले आहे, असे वृत्त सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित होत आहे.

पाकिस्तानला कर्ज न देता परत गेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पथक !

पाकला नाणेनिधीकडून मोठी अपेक्षा होती, तीच मावळल्याने पाकला आता दिवाळखोर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे !