पाकने अटी-शर्ती मान्य न केल्याचा परिणाम !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या पाकिस्तानला आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये गेल्या १० दिवसांपासून ठाण मांडून बसलेले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पथक पाकला फुटकी कवडीही न देता परत गेले आहे. गेल्या १० दिवसांपासून पाकिस्तान सरकार आणि हे पथक यांच्यात चालू असलेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्याने पाकला कोणतेही साहाय्य मिळालेले नाही. नाणेनिधीकडून पाकला अनेक अटी आणि शर्ती सांगण्यात आल्या होत्या. त्यात संरक्षण खर्चामध्ये कपात करणे, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे आदींचा समावेश होता; मात्र सरकारला ते मान्य न झाल्यानेच नाणेनिधीचे पथक परत गेल्याचे म्हटले जात आहे.
Pakistan fails to reach deal with IMF: What it means for economy https://t.co/9qY2Op732B
— TOI Business (@TOIBusiness) February 10, 2023
संपादकीय भूमिकापाकला नाणेनिधीकडून मोठी अपेक्षा होती, तीच मावळल्याने पाकला आता दिवाळखोर होण्यापासून कुणीही रोखू शकत नाहीत, हे अधिक स्पष्ट झाले आहे ! |