कुराण जाळणार्‍या स्‍विडनऐवजी अल्लाकडून तुर्कीयेला शिक्षा ! – तस्‍लिमा नसरीन

लेखिका तस्‍लिमा नसरीन

नवी देहली – इस्‍लामवादी म्‍हणत होते, ‘अल्ला स्‍विडनला शिक्षा देईल’; कारण स्‍विडनमधील लोक कुराण जाळत होते; पण त्‍याऐवजी अल्लाने तुर्कीयेला शिक्षा दिली. वास्‍तविक भूकंपप्रवण भागात भूकंप होतात. त्‍याचा अल्लाशी काही संबंध नाही, असे ट्‍वीट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्‍लिमा नसरीन यांनी केले आहे.