अमेरिकेच्या नागरिकांवर आक्रमण केले, तर आम्ही गप्प बसणार नाही ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

अमेरिकेची इराणला चेतावणी !

अँटनी ब्लिंकन

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्हाला इराणशी वाद नको आहे; पण जर इराण किंवा त्याच्यावतीने इतर कुणी अमेरिकेच्या नागरिकांवर जगात कुठेही आक्रमण केले, तर अमेरिका गप्प बसणार नाही. अमेरिका त्या आक्रमणांचे ठामपणे आणि तत्परतेने प्रत्युत्तर देईल, अशी चेतावणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दिली आहे. या परिषदेत इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धावर चालू असलेल्या चर्चेमध्ये अमेरिकेने ही चेतावणी दिली आहे. दुसरीकडे इराणने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सौजन्य फेस द नेशन 

ब्लिंकन यांनी या वेळी अमेरिकेच्या वतीने सर्व राष्ट्रांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, या युद्धात अमेरिका वा इस्रायल यांना साहाय्य करणार्‍या इतर कोणत्याही देशाविरोधात नवी आघाडी उघडण्याचा विचार करणार्‍या कोणत्याही देशाला इतर सर्व देशांनी मिळून एक संयुक्त संदेश द्यायला हवा. ‘आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नका’, असे या देशांना ठणकावून सांगायला हवे.