अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार ठाणेदार यांचे वक्तव्य

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी ‘हमास’ या आतंकवादी संघटनेला जगातून कायमचे नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. ठाणेदार यांनी हमासचे वर्णन ‘पाशवी आतंकवादी संघटना’ असे केले आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून निष्पाप लोकांना लक्ष्य केले. हमासच्या आतंकवाद्यांनी महिला, लहान मुले आणि वृद्ध यांनाही सोडले नाही. १ सहस्र ४०० लोकांचे प्राण घेतले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर बाँबफेक करत आहे. ठाणेदार यांनी म्हटले की, हमासच्या आतंकवाद्यांना केवळ गाझा हद्दीत हाकलणे पुरेसे नाही. असे केल्यास ते पुन्हा एकत्र येतील. त्यांना कायमचेच नष्ट केले पाहिजे.
सौजन्य एएनआय
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister