किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।

काय सांगू देवा, परम पूज्यांची धर्मसंस्थापनेची महती ।
हिंदु राष्ट्राचे उद्गाते होऊनी, जगदोद्धार करिती ॥
किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।
साधकजन, देवीदेवता, संत, महर्षि त्यांच्या चरणी नतमस्तक होती ॥

कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।

सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥

शिवप्रताप

छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या भव्य कार्यास हिंदूंचे संघटन करण्या आपण सिद्ध होऊया !

अफझलखान आणि अहंकार यांचा वध !

हे आदिशक्ती, या अहंकाराचा कोथळा काढण्याची शक्ती आम्हास दे ।
शिवछत्रपतींच्या या पराक्रमाच्या लढाऊ वृत्तीला स्मरून ॥
अफझलखान वधाच्या निमित्ताने अहंकराचा वध करण्यासाठी बळ दे आम्हास माते, बळ दे ॥

‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।

‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।
हिंदुराष्ट्र पण अमर असे हे अनादि काळहि सांगतसे
अमरत्वाचे कारण नकळे जग आश्‍चर्या करीतसे ॥

श्रीमन्नारायण असता त्राता । साधका नसे कसली चिंता ॥

हात सतत स्वच्छ धुवूया । बाहेर जातांना मास्क लावूया । शासन निर्देशांचे पालन करूया।
घरी राहूनी राष्ट्रकर्तव्य बजावूया । श्रीकृष्ण असता आपला भ्राता । साधका नसे कसली चिंता ॥

आली वर्ष २०२१ च्या ‘सनातन पंचांगा’ची सुवार्ता, मन आनंदी झाले आता ।

हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग । करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥

‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।

बाबर स्वतःला ‘हिंदुस्थानच्या म्हणजे भारताच्या भूमीचा सम्राट’ म्हणवतो. त्यात तो भारताचा उल्लेख ‘हिंदु भूमी’ असाच करतो; परंतु बाबर जरी स्वतःला तात्कालिक सम्राट म्हणवत असला, तरी खरे हिंदु भूमीचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज होत; कारण श्रींच्या इच्छेखातर त्यांनीच हिंदूंच्या या भूमीत हिंदूंचे राज्य स्थापन केले.

माझी प्रिय आई असे गुरुमाऊलीचे रूप जणू !

‘माझी आई आधुनिक वैद्य (सौ.) कस्तुरी भोसले हिचा ‘वैकुंठचतुर्दशीला’ म्हणजे, २९.११.२०२० या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवाच्या कृपेने सुचलेली कविता येथे देत आहे.

अवघा आनंदची भरला परम पूज्यांनी माझ्या जीवनी ।

‘माझ्या साधनाप्रवासाचे चिंतन करतांना माझी व्यवहारात, सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म प्रसार करतांना, हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सेवा करतांना आणि सध्याची स्थिती, यांविषयी मला गुरुकृपेने पुढील कविता सुचली.