अफझलखान आणि अहंकार यांचा वध !

श्री. सुमित सागवेकर

खानाने मंदिरे आणि मंदिरातील मूर्तींवर आघात केला ।
अहंकाराने हृदय मंदिरावर आणि गुरुस्थानावर आक्रमण केले ॥

खानाने आलिंगन दिले छत्रपती शिवरायांना ।
आम्हाला ही आलिंगन दिले या अहंकाराने ॥

खानाने दगा केला राजांच्या पाठीत खंजीरचा वार केला ।
अहंकार प्रतिदिनच दगा करतोय पाठीसह छातीत वार करतोय ॥

खानाने मंदिरे लुटली, प्रजेला लुबाडले, मुलीबाळींची अब्रू लुटली ।
अहंकाराने आमची माणसे तोडली, मन तोडली, लाज घालवली, देवापासून दूर नेले ॥

खानाने दगा केला, शिवरायांनी वाघनखांचा मारा केला ।
खंजीर खुपसून कोथळा काढला ॥

आम्ही अजून अहंकाराच्या मिठीतच आहोत ।
स्वयंसूचना सत्राच्या खंजीराला गंज लागण्याची वेळ आली ॥

दोषनिर्मूलन सारणीची वाघनखे खितपत पडून आहेत ।
हतबल झालोय आम्ही, आम्हाला शिवशक्ती द्या ॥

हे आदिशक्ती, या अहंकाराचा कोथळा काढण्याची शक्ती आम्हास दे ।
शिवछत्रपतींच्या या पराक्रमाच्या लढाऊ वृत्तीला स्मरून ॥

अहंनिर्मूलन करण्यास आम्हास शक्ती आणि भक्ती यांचे वरदान दे माते ।
अफझलखान वधाच्या निमित्ताने अहंकराचा वध करण्यासाठी बळ दे आम्हास माते, बळ दे ॥

– श्री. सुमित सागवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक