अणूबॉम्बच्या सूक्ष्म किरणोत्सर्गांपासून वाचवणारे सूक्ष्म संहारक अग्निहोत्र !

तिसर्‍या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. अणुबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही अग्निहोत्रामुळे वायुमंडलात सिद्ध होणारे दिव्य तेजोमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे जिवाचे क्षण होऊ शकते.

२०१५ मध्ये नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर तेथे निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती !

लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रतिकिलो’ एवढा महाग होता.

आपत्काळापूर्वीच कुटुंबाला लागतील अशा औषधांची सोय करून ठेवा !

भीषण आपत्काळात वैद्यकीय औषधे मिळणार नाहीत; परंतु ईश्‍वरी कृपेमुळे काही झाडांचा औषध म्हणून उपयोग करू शकतो. अशा औषधी वनस्पती आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो.

आपत्काळात धान्यसाठा अधिक काळ टिकावा, यासाठी  हे करा !

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

अधर्माचरण हेच आपत्काळ येण्याचे मूळ कारण !

‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्यादींमुळे देवतांपर्यंत आवश्यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे.

संतांमुळे अद्याप पृथ्वीचे रक्षण !

येणार्‍या आपत्काळात रक्षण होण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रार्थना, नामजप, अनुष्ठाने आदी आध्यात्मिक उपाय अन् ईश्‍वराच्या कृपेसाठी साधना करणे, ही आवश्यकता बनली आहे.

भीषण आपत्काळात औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करा !

भीषण आपत्काळात अल्पमोली अन् बहुगुणी असलेल्या आयुर्वेदीय औषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक आहे.

आपत्काळात पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी हे करा !

आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घ्या !

प्रथमोपचार शिकून जीवदान द्या !

भीषण आपत्काळात विविध आपत्तींमध्ये कुणाला इजा किंवा दुखापत झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत, रुग्णांना कसे हाताळावे याचे सर्वांनीच प्रशिक्षण घ्यावे !

साधना करणारे आपत्काळात इतरांना साह्य करू शकतात !

नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी आक्रमणांच्या वेळी राष्ट्रकर्तव्याची जाण असणारेच भावनाशील न होता तत्परतेने साहाय्य करतात. राष्ट्रकर्तव्याची जाण सर्वांमध्ये निर्माण होण्यासाठी आतापासूनच प्रबोधन आणि जनजागृती करायला हवी. यासह भगवंताची भक्ती आणि साधना केल्यास आपत्काळातून तरून जाता येईल !