आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर सिद्ध व्हा !

महाभयंकर जीवघेण्या आपत्तींमध्ये आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच ! ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, असे वाटत असेल, तर ‘तो आपल्यावर प्रसन्न होईल’, असे आपल्याला केले पाहिजे. महाभीषण आपत्तीतून वाचण्यासाठी भरवसा देवावरच ठेवावा लागतो.

आपत्काळात वीज नसल्यास भ्रमणभाषचा वापर करता येणार नसल्याने एकमेकांच्या मनातील विचार कळण्याइतकी साधना वाढवणे आवश्यक !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १२ – १३ वर्षांपूर्वी सांगितले होते, ‘पुढे येणार्‍या आपत्काळात वीज नसल्यामुळे लांबवर असलेल्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करता येणार नाही. तोपर्यंत आपली साधना एवढी वाढायला हवी की, एकाच्या मनातील विचार दुसर्‍याला कळला पाहिजे.’

आपत्काळात त्रास भोगणे ही साधना !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे सनातनचे व्यापक ध्येय असल्याने त्यात येणारे अडथळेही मोठे आहेत. सध्याच्या आपत्काळात समष्टी प्रारब्ध म्हणून साधक विविध त्रास भोगत आहेत; पण तरीही ते निःस्वार्थीपणे साधनारत आहेत. ‘आपत्काळात त्रास भोगणे’, ही त्यांची साधनाच ठरत आहे.’                                                

संकटाची पूर्वसूचना देणारी झाडे !

संकटाची पूर्वसूचना अधिक चांगल्या प्रकारे देते. जाईची पाने नेहमी वरच्या दिशेला तोंड करून असतात; परंतु संकटकाळी ती उलटी (भूमीच्या दिशेने) होतात.

आपत्काळात ‘जसे व्हायचे असेल, तसे होईल’, अशी मानसिकता नको !

आपत्काळाविषयी गांभीर्य निर्माण होण्याच्या दृष्टीने काही जणांना सांगितले की, ते म्हणतात, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल तेच आमचेही होईल. आपत्काळात जसे व्हायचे असेल, तसे होईल. पुढचे पुढे बघू.’ यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. आपत्काळात ‘जे व्हायचे आहे ते’, म्हणजे विनाश हा होणारच आहे.

देवाची कृपादृष्टी राहावी आणि स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण व्हावे, यांसाठी प्रतिदिन करायच्या काही कृती !

सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ४८ मिनिटांच्या (दोन घटिकांच्या) काळाला ‘संधीकाल’, असे म्हणतात. संधीकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ, तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.

आपत्काळात साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

‘आपत्काळात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार्‍या साधकांचे पीक येणार’, असा गुरूंचा संकल्प झालेलाच आहे. गुरूंचा हा संकल्प साधना करणार्‍या प्रत्येक जिवासाठी कार्यरत झाला आहे. त्यामुळे निर्धार करून साधना कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘आपत्काळ’

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० मार्च या दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन म्हणजे आपत्काळातील संजीवनी !

कोरोनाच्या या काळात समाजातील अनेकांची मनस्थिती अत्यंत बिकट झाली होती. तरी सनातनचे साधक मात्र आनंदी असून त्यांनी स्वतःच्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवण्यासह ते अध्यात्मप्रसाराचे कार्य सामाजिक माध्यमांद्वारे करत आहेत.