१. १०८ श्री नीळकंठ शिवाचार्य स्वामी, धारेश्वर, पाटण, महाराष्ट्र.
१ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले
१. ‘धर्मकार्याला साधनेची जोड देण्यासाठी धर्मसेवा करत असतांना भगवंताचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, हे महत्त्वपूर्ण सूत्र स्वामीजींनी अत्यंत सुंदर उदाहरण देऊन सांगितले.
२. त्यांना हिंदु धर्माचे सखोल ज्ञान असल्याने ते ओजस्वी वाणीतून धर्माविषयी सोपी सूत्रे सांगून श्रोत्यांना धर्मज्ञान देत होते आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत करत होते. त्यामुळे श्रोत्यांची दृष्टी त्यांच्या रूपावर आणि कान त्यांच्या वाणीवर खिळून राहिले होते.
३. त्यांनी धर्मसूत्र सांगून हिंदूंमधील चुकीची मनोधारणा खोडून काढली, तसेच हिंदूंमधील विविध प्रकारचे भेदभाव मिटवून त्यांच्यामधील सांघिकभाव वृद्धींगत होण्यासाठी धर्मशास्त्रातील सूक्ष्म सूत्रांचे सुंदर विवेचन केले. त्यातून त्यांनी उपस्थित हिंदूंमध्ये सांघिकभाव जागृत केल्याचे जाणवले.’
१ आ. श्री. निषाद देशमुख
१. ‘महाराजांमध्ये ‘राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम, धर्मरक्षणाची तळमळ, देवतांविषयी भाव आणि स्वीकारण्याची वृत्ती’, हे गुण आहेत.’
१ इ. श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ‘महाराजांमध्ये क्षात्रवृत्ती आहे. त्यामुळे श्रोत्यांना धर्मकार्याची प्रेरणा मिळत होती.’
२. श्री. राजीव झा, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केसरिया हिंदू वाहिनी, गोवा.
२ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले
१. ‘त्यांचा गोमातेविषयी पुष्कळ भाव असल्यामुळे ते गोमातेला आदरभावाने संबोधतात. त्यामुळे त्यांची वाणी ऐकून गोमातेविषयीचा भाव जागृत होतो.
२. त्यांच्यात पुष्कळ क्षात्रवृत्ती असल्याने ते गोतस्करांशी संघर्ष करून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमातेला सुखरूपपणे सोडवून आणतात.
३. त्यांनी गोसेवा केल्यामुळे त्यांच्यात सात्त्विकता आणि गोरक्षण केल्यामुळे त्यांच्यात क्षात्रतेज जागृत झाले आहे. त्यामुळे ते खर्या अर्थाने ‘गोरक्षक’ आहेत.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |