‘८.७.२०२४ या दिवशी श्रीमती आदिती देवल यांचे निधन झाले. ९.७.२०२४ या दिवशी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. काकूंच्या देहातून वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते.
२. त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर मला ईश्वरी आनंदाची अनुभूती येत होती.
३. काकूंच्या डोक्यापासून ३ मीटर अंतरावर मला त्यांचा पांढर्या रंगाचा आणि गोल आकारातील लिंगदेह दिसला. मी त्या लिंगदेहाकडे पाहिल्यावर तो मला म्हणाला, ‘मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण येत आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२४)
श्री. राम होनप यांचा प्रश्न : ‘मी काकूंच्या पार्थिवाचे दर्शन घेत असतांना त्यांचा लिंगदेह मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘मला ‘साखरेचा शिरा आणि त्यावर साजूक तूप’, खाण्याची इच्छा आहे. नंतर (निधनानंतरच्या १० व्या दिवशीच्या विधीच्या वेळी) मला तो हवा आहे.’
१०.७.२०२४ या दिवशी मी देवलकाकूंची कन्या सौ. राजलक्ष्मी जेरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना अनौपचारिकपणे विचारले, ‘‘देवलकाकूंना साखरेचा शिरा आवडायचा का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हो. आवडायचा.’’
वरीलप्रमाणे काकूंच्या दहाव्याला ‘साखरेचा शिरा आणि त्यावर साजूक तूप’, असे द्यायचे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले : हो.
|