वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

 १. पू. श्री रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान, छत्तीसगड.

पू. श्री रामबालक दासजी महात्‍यागी महाराज

१ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘त्यांची साधना चांगली असल्याचे जाणवते. महाराजांवर शिवाची कृपा आहे. त्यामुळे त्यांचे आत्मबळ जागृत असून ते त्या बळावर धर्मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य प्रभावीपणे करतात.

२. त्यांच्यात ‘व्यापकता आणि हिंदु समाजाविषयी प्रेमभाव’ जाणवतो. त्यांना आदिवासी हिंदूंविषयी आत्मीयता वाटत असल्याने त्यांच्याविषयी महाराजांच्या मनात कल्याणाची भावना आहे. त्यामुळे ते आदिवासींचे धर्मांतर रोखण्यासाठी कृतीशील प्रयत्न करतात.

३. त्यांच्यात ‘क्षात्रतेज, धर्मतेज, ज्ञानतेज आणि ब्राह्मतेज’, या चारही प्रकारच्या तेजांचा सुरेख समुच्चय असल्याचे जाणवले. त्यामुळे ते हिंदु समाजाला जागृत करून त्याच्या मनावर हिंदु राष्ट्र-स्थापनेचा विषय प्रभावीपणे बिंबवण्याचे महत्त्वपूर्ण धर्मकार्य करत आहेत.’

१ आ. श्री. निषाद देशमुख

श्री. निषाद देशमुख

१. ‘महाराजांमध्ये ‘प्रखर धर्मनिष्ठा’, ‘शिकण्याची वृ‌त्ती’, ‘प्रेमभाव’, ‘नम्रता’ आणि ‘आज्ञापालन’, हे प्रधान गुण आहेत.

२. त्यांच्यात ज्ञान, कर्म आणि नेतृत्व यांचा उत्तम संगम आहे. त्यामुळे ते धर्मकार्य प्रभावीपणे आणि निरंतर कार्यरत राहून करतात.

३. साधनेमुळे बुद्धी सात्त्विक झाल्यामुळे त्यांचे विचार अत्यंत प्रतिभाशाली आहेत आणि भाषा शुद्ध अन् ओघवती आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेला विषय श्रोत्यांच्या अंतर्मनात पोचला. ते ‘हिंदुत्वाचे रक्षण एकत्रितपणे कसे करू शकतो ?’, यादृष्टीने विचार करतात.

४. महाराजांनी प्रायोगिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या सर्व स्तरांवर मार्गदर्शन केले. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकता आणि श्रोत्यांच्या मनातील धर्मनिष्ठा यांत वाढ झाली.’

१ इ. श्री. राम होनप

श्री. राम होनप

१. ‘महाराजांच्या चेहर्‍यावर क्षात्रतेज दिसून येते.

२. त्यांच्या वाणीद्वारे लाल रंगाची दैवी ऊर्जा श्रोत्यांपर्यंत पोचत होती.

३. महाराजांच्या तेजस्वी वाणीमुळे सभागृहात नवचैतन्य निर्माण झाले.

४. महाराजांना भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त आहे.

५. आकाशात वीज कडाडत असतांना तिचा जसा आकार दिसतो, तशी महाराजांच्या वाणीतून चैतन्याची निर्मिती होऊन ते श्रोत्यांपर्यंत पोचत होते.’

२. श्री. चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक अध्यक्ष, युवा ब्रिगेड, बेंगळुरू, कर्नाटक.

श्री. चक्रवर्ती सुलीबेले

२ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘त्यांच्यात पुष्कळ सात्त्विकता आणि सकारात्मक शक्ती कार्यरत असल्याचे जाणवते.

२. त्यांच्यावर श्री गणेशाची कृपा असल्याने त्यांची बुद्धी आणि वाणी पुष्कळ सात्त्विक आहे. त्यांची बुद्धी प्रगल्भ असल्यामुळे ते ज्ञानतेजाच्या बळावर हिंदुत्वाच्या प्रसाराचे कार्य त्यांच्या तेजस्वी विचारांतून प्रभावीपणे करतात.

३. त्यांच्यामध्ये प्रखर धर्मप्रेम आणि हिंदुत्वनिष्ठा आहे, तसेच त्यांच्यामध्ये संघटनकौशल्य आहे. त्यामुळे ते हिंदु युवकांचा धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्मसेवा करण्यासाठी प्रेरित करतात.

४. त्यांच्यामध्ये धर्मशक्ती कार्यरत असल्यामुळे ते उत्साहाने सतत दीर्घकाळ धर्मसेवा करू शकतात. त्यांचे भाषण ऐकत असतांनाही श्रोत्यांचा धर्माभिमान जागृत होऊन त्यांच्यात संघटितपणे धर्मसेवा करण्याचा उत्साह निर्माण होतो.

५. ‘त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे जाणवते.’

२ आ. श्री. निषाद देशमुख

१. ‘श्री. सुलीबेले यांची आंतरिक साधना असल्याने त्यांना ‘आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून हिंदुत्वाचे कार्य करणे आणि समाजाकडून धर्माचरण करून घेणे’, हे सहज शक्य होत आहे.

२. त्यांच्यावर अनेक देवतांची कृपा आहे. त्यामुळे हिंदूसंघटन आणि धर्मजागृती करणे त्यांना शक्य होत आहे.

३. त्यांच्यात ‘अभ्यासू वृत्ती’, ‘समाजाप्रती प्रेम’, ‘नेतृत्व’, ‘इतरांचा विचार करणे’, असे गुण आहेत. या गुणांमुळे नवनवीन संकल्पनांद्वारे ते समाजाला धर्मजागृती आणि धर्मावरील आघातांचा प्रतिकार करण्यासाठी एकत्रित करू शकतात.’

२ इ. श्री. राम होनप

१. ‘त्यांच्यात धर्मकार्याची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे त्यांना देवाचे साहाय्य मिळते, परिणामी त्यांना कार्यात यश प्राप्त होते.

२. ते उत्साही असून सतत सकारात्मक राहून कार्य करतात.’

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.