दिशा योग्‍यच; पण..!

भारत ही त्‍याच्‍या व्‍यापारासाठी अत्‍यंत मोठी बाजारपेठ आहे. व्‍यापाराच्‍या माध्‍यमातून चीन प्रत्‍येक वर्षाला भारतातून सहस्रो कोटी रुपये घेऊन जातो आणि हाच पैसा तो भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! सरकारने प्रथम शत्रूची रसद तोडली पाहिजे. त्‍यासाठी चिनी मालावर बहिष्‍कार घालण्‍याचा संस्‍कार जनतेवर करावा लागेल !

‘ऑनलाईन गेम’चा जुगार !

‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्‍बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्‍हा एक हरतो, तेव्‍हाच दुसरा जिंकतो. यामध्‍ये हरणारे प्रसंगी आयुष्‍यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्‍थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे.

आपत्ती निवारण दल हवेच !

नेहमीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार्‍या रायगडसह कोकण पट्ट्यातही दरडी कोसळण्‍याच्‍या घटना पावसात हमखास घडतातच. वर्ष २०१६ मध्‍ये येथील सावित्री नदीवरील पूल तुटून बस पाण्‍यात पडून मोठी दुर्घटना घडली होती.

आतंकवादाचा अंत कधी ?

पुण्‍यात पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ला) हवे असलेल्‍या २ आतंकवाद्यांना पकडण्‍यात यश आले. या आतंकवाद्यांना पकडणार्‍यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्‍यात आले होते.

जिहादची परि‘सीमा !’

सीमा-सचिन प्रकरण प्रत्‍येक दिवशी नवीन वळण घेत आहे. सचिन मीणा याच्‍या भोवतीही संशयाचे दाट धुके आहेत. या सर्वांमध्‍ये अनेक महत्त्वाचे प्रश्‍न अनुत्तरीत रहातात.

विरोधकांची ‘इंडिया’ नकोच !

देशात लोकसभेच्‍या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्‍याची जय्‍यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्‍पा म्‍हणून सत्ताधारी आणि विरोधक आपापल्‍या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?