समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांनी संपर्क साधावा…

बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे कौशल्य असणारे बाहेरील कारागीर, तसेच साधक-कारागीर यांची माहिती पाठवा !

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. अशा वेळी प्रवास, वैद्यकीय कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागेल.

औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता !

शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी त्यांची माहिती पाठवावी.

ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळणे यांसारख्या संदेशांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

कोणी दूरभाष किंवा भ्रमणभाषवर आधारकार्ड अथवा एटीएम् पिन क्रमांक मागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या लिखाणाची संकलन सेवा करू इच्छिणार्‍या साधकांनी आपली माहिती पाठवावी !

ही सेवा घरी राहून करता येईल. ही सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून दिलेल्या सारणीनुसार आपली माहिती संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्त्यावर पाठवावी.

दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण पाठवतांना केवळ नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण थोडक्यात पाठवा !

केवळ ‘गोवा आवृत्ती’च चालू असल्याने साधकांचे सर्व लिखाण लगेचच प्रसिद्ध करता येणे शक्य होत नाही. दळण-वळण बंदीमुळे संकलन करणार्‍या साधकांची संख्याही अल्प आहे. यापुढे लिखाण पाठवतांना साधकांनी सूचनेतील सूत्रे लक्षात घेऊन ते पाठवावे.

‘स्वतःच्या चल आणि अचल संपत्तीचे ‘सत्पात्रे दान’ व्हावे’, या हेतूने ती सनातन संस्थेला दान करण्यास इच्छुक असल्यास आपल्या हयातीत अर्पण करा !

सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांतील संपत्ती ‘सत्पात्रे दान’ म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांसाठी आवाहन !

साधकांनो, समर्पितभावाने धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी होऊन संधीकालीन साधनेचा लाभ करून घ्या !

कोरोनामुळे गेले १० मास सनातन संस्थेचा धर्मप्रसार ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू होता. आता स्थिती पूर्ववत् होत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून सनातनचे साधक पूर्वीप्रमाणे समाजात जाऊन धर्मप्रसार करणार आहेत.