साधकांना सूचना, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना विनंती
आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्यांकडे नेणे, सामान आणणे इत्यादी कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा (उदा. बैलगाडी, घोडागाडी यांचा) वापर करावा लागेल. बैलगाडी आणि घोडागाडी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासाठी यांत्रिक वाहनांप्रमाणे मोठी गुंतवणूक आणि दुरुस्ती यांकरता व्यय करावा लागत नाही, तसेच या गाड्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणही होत नाही. त्यांची दुरुस्ती स्थानिक पातळीवर सहज होऊ शकते.
१. बैलगाडी किंवा घोडागाडी बनवणार्या आणि त्यांची देखभाल-दुरुस्ती करणार्या कारागिरांची माहिती पाठवा !
आधुनिकीकरणामुळे सध्या बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे प्रमाण अल्प झाले असले, तरी पूर्वी बैलगाडी किंवा घोडागाडी बनवणारे अनेक कारागीर आजही गावा-गावांत उपलब्ध आहेत. यात देखभाल-दुरुस्ती करणार्या कारागिरांचाही समावेश आहे. आपल्या परिचयात असे कारागीर असल्यास त्यांची खालीलप्रमाणे माहिती स्थानिक साधकांना कळवावी. त्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून माहिती पाठवावी.
२. साधक-कारागिरांचीही माहिती कळवा !
काही साधक-कारागिरांकडे बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे वा दुरुस्त करण्याचे कौशल्य असते. अशा साधक-कारागिरांची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी. या माहितीमध्ये ‘ते सेवा म्हणून कि सेवामूल्य घेऊन ही सेवा करणार ?’, हेही नमूद करावे.
वरील सर्व माहिती खालील संगणकीय पत्त्यावर पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१