मार्च-एप्रिल २०२१ मध्ये हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वाच्या संदर्भात साधकांसाठी सूचना

‘११.३.२०२१ ते २७.४.२०२१ या काळात हरिद्वार (उत्तराखंड) येथे महाकुंभपर्व असणार आहे. या कालावधीत कुंभक्षेत्री धर्मप्रसार आणि ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहे. कुंभपर्वाच्या सेवेला येणार्‍या साधकांसाठी सूचना पुढे दिल्या आहेत.

आपत्काळात उपयुक्त ठरणार्‍या सौरऊर्जा यंत्रणेची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी अल्प विजेवर चालणारी सुधारित उपकरणे वापरा !

‘आगामी आपत्काळात ‘सौरऊर्जेद्वारे मिळणार्‍या विजेचा वापर योग्य प्रकारे व्हावा’, यासाठी आवश्यक सूत्रे पाहूया …

देशी गाय आणि बैल अर्पण देऊ इच्छिणारे आणि त्यांचा काही काळ सांभाळ करू इच्छिणारे यांनी संपर्क करा !

भावी आपत्काळात सनातन आश्रमातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देशी गायी आणि बैल यांची आवश्यकता भासणार आहे. गायी आणि बैल अर्पण देण्यासाठी किंवा त्यांचे काही काळ संगोपन सेवा करण्याची सिद्धता असणार्‍यांनी संपर्क साधावा.

कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. त्यामुळे सावधानता बाळगून कुटुंबीय आणि मित्रपरिवारांना सावध करावे !

हरिद्वार येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू, ओळखीच्या संतांचा आश्रम उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता हरिद्वारमधील स्वतःची वास्तू, तसेच ओळखीच्या संतांचा आश्रम विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.

हरिद्वार येथील कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील सायकली, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत. तसेच १० सुस्थितीतील सायकली आवश्यक आहेत.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांनी संपर्क साधावा…