धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

सनातन संस्थेचा ‘धर्मरथ’

सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.

समाजापर्यंत शीघ्रतेने पोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे ‘ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल’ परवाना असणे आवश्यक आहे.

जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

ज्यांना धर्मरथ (ट्रक) चालवता येत नाही; मात्र  शिकण्याची इच्छा आहे त्यांना धर्मरथ चालवण्यास  शिकवण्यात येईल.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१० (सकाळी १० ते  सायंकाळी ७ या वेळेत संपर्क करावा.)
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन  – ४०३४०१’
संगणकीय पत्ता : [email protected]