आरोग्यविषयीची संसाधने वाढत्या रुग्णांपुढे न्यून पडल्यास दळणवळण बंदी करावी लागते ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही.

वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाचा निर्णय !

डोंबिवली येथे नियमाचा भंग करणार्‍या १२५ आंदोलनकर्त्या व्यापार्‍यांवर गुन्हे नोंद

प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापार्‍यांवर डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.

पुणे येथील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना मृत्यू का ? – केंद्रीय आरोग्य सचिवांचा प्रश्‍न

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे घेतलेल्या बैठकीला पुणे आणि मुंबई येथील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी अग्रवाल यांनी पुणे-मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या संसर्गाविषयी विचारणा केली.

विरोधकांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी निरर्थक ! – प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस

अधिकार्‍यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याविना हे होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला.

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे नोंद, तर ४ जणांना अटक

हिंदूंकडून शांततेत आणि नियम पाळून आरती केल्यावर आणि त्यात धर्मांधांनी अडथळा आणल्यावर हिंदूंवर गुन्हे का नोंद करण्यात आले ? हा पोलिसांचा पक्षपातीपणा आहे, असे हिंदूंना वाटते.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणार्‍या २ महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

सबा बावडा येथील १०० फुटी रस्त्यावर मद्यपान करून धिंगाणा घालणार्‍या तिघांवर कारवाई केली आहे. यात बळवंत पाटील आणि राजकुमार साळुंखे या दोन महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

आघाडीतील घटक असलेल्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी चेतावणीसुद्धा दिली.    

घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका ! – मणिपूर सरकारचा सीमेलगतच्या ५ जिल्ह्यांना आदेश

म्यानमारमधील सैन्याच्या बंडामुळे निर्माण झालेल्या अराजकतेचा परिणाम !

गोकुळच्या निवडणुकीत आवेदन प्रविष्ट करण्यासाठी प्रचंड गर्दी

आवेदन प्रविष्ट करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने गोकुळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर आणि इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आवेदन प्रविष्ट करण्यासाठी येतांना उमेदवार शक्तीप्रदर्शन करत येत असल्याने गर्दी वाढत आहे.