मालवण पंचायत समिती राबवणार ‘ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम’ हा अभिनव उपक्रम

ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेणार्‍या मालवण पंचायत समितीचे अभिनंदन !

वर्ष २०२० मध्ये भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरीच्या ४८९ घटना !

ही संख्या शून्य होणे हीच स्थिती खर्‍या अर्थाने सीमा सुरक्षित असल्याचे दर्शक ठरील !

वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईच्या इशार्‍यानंतर ट्विटरकडून भारतविरोधी ७०९ खाती बंद

सरकारने आता ‘अ‍ॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, !

आतापर्यंत राज्यातील ५ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया चालू आहे. ६५२ केंद्रांवर ही लस दिली जात आहे.

कटाच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी सैन्याने अनुमती दिली असल्याविषयी न्यायालयाने ले. कर्नल पुरोहित यांच्याकडे मागितले पुरावे

मालेगाव येथे बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला सैन्याच्या आदेशावरून गुप्तवार्ता मिळवण्यासाठी उपस्थित असल्याची स्वत:ची बाजू कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात मांडली आहे.

देहलीतील शेतकर्‍यांना चर्चा नाही, तर तमाशा करण्यातच रस ! – पाशा पटेल

सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला सिद्ध असतांना शेतकर्‍यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्‍न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

आज कोल्हापुरात दुर्ग परिषद ! – सुखदेव गिरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडनंतर होणार्‍या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे.

काँग्रेस हा गोंधळलेला पक्ष ! – पंतप्रधान मोदी

मोदी म्हणाले की, यूपीएच्या शासनकाळात ‘ए.पी.एम्.सी.’ कायद्यात पालट सुचवणारे तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे आज त्याचा आधार घेऊन बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला करवसुलीसाठी पाठवलेल्या नोटिसीला स्थगिती

श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा सामाजिक संस्था कोणीही कर चुकवला तरी चूकच नव्हे का ?

मुंबईत आधुनिक वैद्यांचे अपहरण करणार्‍या टोळीला अटक

इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?