(म्हणे) भारतात हिंदुत्वाच्या नावाखाली आतंकवाद वाढतोय !

पाकिस्तानपुरस्कृत आतंकवाद संपवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला आहे. पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे.

(म्हणे) ‘भारतात पर्यटनासाठी जाणार्‍या अमेरिकन नागरिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाणे टाळावे !’ – ट्रम्प सरकारचा अमेरिकन नागरिकांना सल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढल्या असून तेथे सामाजिक अशांतता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय भारत-पाक सीमेवर तणाव आहे. त्यामुळे भारतात पर्यटनासाठी जाणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनी पर्यटनासाठी शक्यतो जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ नये.

‘एच्-१ बी’ व्हिसाच्या नियमांमधील  बदलास अमेरिकन संसद सदस्यांचा विरोध

एच-१ बी’ व्हिसा नियमात पालट (बदल) करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूह यांनी विरोध केला आहे.

माझ्या पटलावरही (टेबलवरही) महाशक्तीशाली अणूबॉम्बचे बटण आहे ! – ट्रम्प यांचे उत्तर कोरियाला प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून ‘माझ्या पटलावरही महाशक्तीशाली अणूबॉम्बचे बटण आहे,’ अशा शब्दांत जोंग यांना प्रत्युत्तर दिले.

अमेरिकेचा पाकला दणका : २५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य रोखले

अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देत असलेले २५५ दशलक्ष डॉलरचे साहाय्य रोखले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील आतंकवाद्यांच्या तळांवर प्रथम कारवाई करावी.

उत्तर कोरियाला धडा शिकवण्यासाठी आयात-निर्यात यांवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध !

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर नवीन निर्बंध लावल्याने त्याची पेट्रोलियम पदार्थांची ९० टक्के आयात बंद होणार आहे. तसेच सुरक्षा परिषदेने कोरियाच्या निर्यात वस्तूंवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्लामी देशांचा विरोध झुगारून अमेरिकेकडून जेरूसलेम इस्रायलची राजधानी म्हणून घोषित !

इस्रायलने १९६७ मध्ये युद्ध करून जेरूसलेमवर विजय मिळवला आणि १९८० मध्ये तिला राजधानी घोषित केले; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि अमेरिकेनेही त्याला मान्यता दिली नाही.

(म्हणे) विजय मल्ल्या यांनी केलेल्या फसवणुकीविषयी पुरावे नाहीत ! – मल्ल्या यांच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद

भारत सरकारने विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध केलेल्या फसवणुकीच्या आरोपांविषयी काही पुरावेच नाहीत, असा युक्तीवाद विजय मल्ल्या यांचे अधिवक्ता यांनी येथील न्यायालयात केला.

शिकागो (अमेरिका) येथील एका चर्चचे नृत्य निकेतनमध्ये रूपांतर होणार

येथील लिंकन पार्कमधील १४२ वर्षे जुन्या हरमन बाप्टिस्ट चर्चचे नृत्य निकेतनमध्ये रूपांतर करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

पाकच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे अणू युद्धाचा धोका ! – अमेरिका

पाकचा अण्वस्त्र कार्यक्रम धोकादायक असून त्यामुळे अणू युद्धाचा धोका आहे, अशी भीती अमेरिकेची ‘थिंक टँक’ असलेल्या ‘अटलांटिक काऊन्सिल’ने त्यांच्या ‘एशिया इन सेकंड न्यूक्लिअर एज्’ या अहवालात व्यक्त केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now