UNSC India : इस्रायल-हमास संघर्षामुळे समुद्री व्यापार असुरक्षित !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे वक्तव्य

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे भारताचे उपस्थायी प्रतिनिधी आर्. रवींद्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – गाजामध्ये गेल्या १०९ दिवसांपासून चालू असलेल्या युद्धामुळे २५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यातून मानवीय संकट तर निर्माण झाले आहेच; परंतु त्यासमवेत हिंद महासागरातून चालू असलेल्या समुद्री व्यापारालाही त्याचा फटका बसत आहे, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे भारताचे उपस्थायी प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी केले.

रवींद्र पुढे म्हणाले की,

१. भारताच्या जवळ अनेक आक्रमणे झाली आहेत. यामुळे भारताच्या ऊर्जा आणि आर्थिक हित यांवर थेट परिणाम झाला आहे. गाजामधील युद्ध भयावह झाले असून या संकटाला स्पष्टपणे रेखांकित केले पाहिजे.

२. पॅलेस्टिनी शरणार्थींसाठी भारताने मोठ्या प्रमणात अर्थसाहाय्य केले आहे. भारताने आतापर्यंत ५ दशलक्ष अमेरिकी डॉलर (४१.५८ कोटी रुपये) साहाय्य पुरवले आहे.