अमेरिकेचे सिरीयावर पुन्हा आक्रमण

अमेरिकेने पुन्हा एकदा सिरीयावर आक्रमण केले आहे. ‘सिरीयाचे राष्ट्रप्रमुख बशर असद यांच्याकडील रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले आणि त्यासाठी अमेरिकेचे …..

कॅलिफोर्नियातील ‘यू-ट्यूब’च्या मुख्यालयात गोळीबार

उत्तर कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील ‘यू-ट्यूब’च्या मुख्यालयात एका महिलेने केलेल्या गोळीबारात ४ जण घायाळ झाले. घायाळ नागरिकांवर ‘सॅन फ्रान्सिस्को जनरल हॉस्पिटल’ येथे उपचार चालू आहेत.

अमेरिकेकडून हाफीज सईदचा राजकीय पक्ष ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित !

पाकिस्तानमधील जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे राजकीय प्रवेशाचा सईदचा डाव फसला आहे.

नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून कर्जवसुली करण्यास मनाई – न्यूयॉर्क न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती

पंजाब नॅशनल बँकेत महाघोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या ‘फायरस्टार डायमंड कंपनी’कडून देणेकर्‍यांना कर्जवसुली करण्यास न्यूयॉर्कमधील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार

येथील पार्कलॅण्डमधील ‘मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूल’मधील निकोलस क्रूज या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात १७ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

(म्हणे) भारतात हिंदुत्वाच्या नावाखाली आतंकवाद वाढतोय !

पाकिस्तानपुरस्कृत आतंकवाद संपवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला आहे. पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे.

(म्हणे) ‘भारतात पर्यटनासाठी जाणार्‍या अमेरिकन नागरिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाणे टाळावे !’ – ट्रम्प सरकारचा अमेरिकन नागरिकांना सल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया वाढल्या असून तेथे सामाजिक अशांतता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय भारत-पाक सीमेवर तणाव आहे. त्यामुळे भारतात पर्यटनासाठी जाणार्‍या अमेरिकेच्या नागरिकांनी पर्यटनासाठी शक्यतो जम्मू-काश्मीरमध्ये जाऊ नये.

‘एच्-१ बी’ व्हिसाच्या नियमांमधील  बदलास अमेरिकन संसद सदस्यांचा विरोध

एच-१ बी’ व्हिसा नियमात पालट (बदल) करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूह यांनी विरोध केला आहे.

माझ्या पटलावरही (टेबलवरही) महाशक्तीशाली अणूबॉम्बचे बटण आहे ! – ट्रम्प यांचे उत्तर कोरियाला प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून ‘माझ्या पटलावरही महाशक्तीशाली अणूबॉम्बचे बटण आहे,’ अशा शब्दांत जोंग यांना प्रत्युत्तर दिले.

अमेरिकेचा पाकला दणका : २५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य रोखले

अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देत असलेले २५५ दशलक्ष डॉलरचे साहाय्य रोखले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील आतंकवाद्यांच्या तळांवर प्रथम कारवाई करावी.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now