Artificial Intelligence Effect : कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (‘आर्टिफिशल इंटेलिजन्ट’मुळे) जगातील ४० टक्के नोकर्‍या धोक्यात येतील !

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जीवा यांचा दावा !

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जीवा

वॉशिंग्टन (अमेरिका) – कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे जगातील ४० टक्के नोकर्‍या धोक्यात येतील, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जीवा यांनी केले आहे. त्या स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात आयोजित ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या पार्श्‍वभूमीवर बोलत होत्या.

१. जॉर्जीवा पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकतो. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर उत्पादन वाढवण्यासाठी केला जाऊ शकत असल्याने तो या दृष्टीने संधीही उपलब्ध करून देणार आहे. विकसनशील देशांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभाव अल्प होऊ शकतो; मात्र जागतिक स्तरावर ४० टक्के नोकर्‍यांवर परिणाम होऊ शकतो.

२. जॉर्जीवा पुढे म्हणाल्या की, वर्ष २०२४ जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण वर्ष होऊ शकतो. जग कोरोनाच्या काळात घेतलेल्या कर्जातून अद्याप बाहेर पडलेली नाही. तसेच जगातील ६० देशांमध्ये निवडणुका हाणार आहेत. अशा वेळी तेथील सरकारे लोकांना आकर्षित करण्यासाठी पैसे खर्च करतील आणि त्यामुळे त्या देशांवर कर्ज वाढेल.