Canada Accuses India’s Interference : कॅनडाच्या निवडणुकांत भारताने हस्तक्षेप केल्याचा कॅनडाचा फुकाचा आरोप !

कॅनडाचा सरकारी आयोग चौकशी करणार

ओटावा (कॅनडा) – भारतावर खलिस्तानी आतंकवादी निज्जर याची हत्या करण्याचे बिनबुडाचे आरोप करणार्‍या कॅनडाकडे त्याविषयीचे पुरावे मागितले असता अजूनही तो कोणताच पुरावा देऊ शकलेला नाही. अशातच त्याच्या ‘फॉरीन इंटरफेरन्स कमिशन’ने भारतावर गंभीर आरोप केला आहे. ‘भारताने तेथील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केला’, असे या आयोगाचे म्हणणे आहे. याची चौकशीही हा आयोग करणार आहे, असे त्याने म्हटले आहे.

याआधीही कॅनडाने वर्ष २०१९ आणि २०२१ मध्ये चीन त्याच्या निवडणुका प्रभावित करत असल्याचा आरोप केला होता. भारतावरील आरोपांची चौकशी करून कॅनडाचा आयोग ३ मे २०२४ पर्यंत अंतरिम अहवाल पूर्ण करणार आहे, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम अहवाल सादर करणार आहे. हा आयोग रशिया आणि इराण यांच्या कथित सहभागाचीही चौकशी करत आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताने जरी असे काही केले, तरी ते कॅनडाला कधीच लक्षात येणार नाही. तरीही असे दूधखुळे आरोप करून त्याविषयी चौकशी करण्याचा कॅनडाचा हा फुकाचा प्रयत्न भारतद्वेषीच होय, हे लक्षात घ्या !
  • कॅनडाची यंत्रणा कमकुवत आणि नाकर्ती असल्यानेच अन्य देश त्याच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसतात, असेच यातून म्हणता येईल !