वॉशिंग्टन – अलबामा राज्यातील केनेथ स्मिथ याला एका हत्येच्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला नायट्रोजन वायू सोडून मृत्यूदंड देण्यात आला. अमेरिकेत प्रथमच नायट्रोजन वायू सोडून गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्यात आला. अलबामा कारागृहातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिथला प्रथम एका चेंबरमध्ये नेण्यात आले आणि त्याला स्ट्रेचरवर बांधण्यात आले. त्याच्या तोंडावर मुखवटा घातला गेला आणि त्यात नायट्रोजन वायू सोडला गेला.
अमेरिकेत वर्ष १९८० पासून विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंड दिला जातो. त्यामुळे हृदय काम करणे बंद करते; मात्र अनेक राज्यांमध्ये या पद्धतीमध्ये समस्या दिसून येत आहे. वर्ष २०२२ मध्ये स्मिथला विषारी इंजेक्शन देऊन शिक्षा करण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण तो वाचला होता. त्यामुळे त्याला नायट्रोजन वायू सोडून मृत्यूदंड देण्यात आला.