Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांनी अमेरिकी नौकेवर डागल्या ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !

अमेरिकेने हवेतच केली नष्ट !

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे समुद्री आक्रमणांत वाढ झाली आहे. येमेनच्या हुती बंडखोरांनी २४ जानेवारी या दिवशी मध्य-पूर्वेतील एडनच्या खाडीत अमेरिकेच्या एका नौकेवर आक्रमण केले. त्यांनी ‘मेसर्क डेट्रॉइट’ या अमेरिकी नौकेवर ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यांतील एक समुद्रात पडले, तर अन्य दोघांना अमेरिकेने हवेतच नष्ट केले.

हुती बंडखोरांच्या वाढत्या कारवायांच्या विरोधात अमेरिका आणि ब्रिटन यांनी २२ जानेवारी या दिवशी त्यांच्या मूळ ठिकाणांवर आक्रमण करून मोठी हानी केली होती. या कारवायांना कॅनडा, नेदरलँड्स, बहरीन आणि ऑस्ट्रेलिया यांनी समर्थन घोषित केले होते.