पुणे महापालिकेने ११ इमारतींतील ५०० सदनिका पाडल्या !

अनधिकृत इमारती बांधल्या जाऊ नयेत, यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार ? विनाअनुमती बांधकाम करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वन विभागाकडून १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.

अहिल्यानगर येथे ‘टिपू सुलतान शरीरसौष्ठव स्पर्धे’चे आयोजन !

उत्कर्ष गीते म्हणाले की, भविष्यात औरंगजेब, अकबराच्या नावाने, महंमद गझनीच्या नावानेही अशा संस्था निघतील आणि या संस्था असेच उपक्रम राबवून मोगलांचे उदात्तीकरण करतील.

नवीन समवेत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनरुज्जीवित करावे ! – प्रशांत दामले, अभिनेते आणि नाटककार

राज्यात अनेक नाट्यगृहे उभारण्यात आली आहेत; मात्र या नाट्यगृहांची सध्या दुरवस्था झाली आहे. राज्यशासन आता कोट्यवधी रुपये व्यय करून ७० नवीन नाट्यगृहे उभारणार आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील ४३ पतसंस्था अवसायनात !

ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत, त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते.

रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडला

तालुका स्तरावर कृती आराखड्याविषयी दुर्लक्ष केले जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता कृती आराखडे वेळेत सादर न होणे, हे लज्जास्पद !  

देशाची ‘सेक्युलर’ शब्दामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे देशातील श्रद्धास्थाने, परंपरा यावर आघात केले गेले. ‘परकीय आहे ते चांगले आणि भारतीय म्हणजे टाकाऊ’ अशी भावना जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न झाला.

#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !

भूमी मंदिराच्या अखत्यारीत असतांनाही कानिफनाथांची मूर्ती हटवण्याची धर्मांधांची मागणी !

धर्मांध मुसलमान आणि वक्फ बोर्ड कशा प्रकारे हिंदूंच्या मंदिरांची भूमी गिळंकृत करत आहेत, याचे हे उदाहरण ! वक्फ बोर्डवर सरकारने कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटित होण्याविना पर्याय नाही.

पुणे जिल्ह्यात दीड लाख मतदारांचे चेहरे एकसारखे !

निवडणूक आयोगाने मतदारसूची शुद्धीकरणासाठी कार्यवाही चालू केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात एकाच मतदाराचे २ ठिकाणी नाव नोंदणीचे २८ सहस्र, तर समान छायाचित्र असणारे १ लाख ४२ सहस्र ३४९ मतदार आढळले आहेत.