विद्यार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्रभक्‍ती दृढ करण्‍यात राष्‍ट्रीय छात्रसेनेचे योगदान ! – गिरीश महाजन, क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री

विद्यार्थी हे देशाचे भविष्‍य आहेत. राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांमध्‍ये एकता, शिस्‍त आणि राष्‍ट्रभक्‍ती दृढ होण्‍यास साहाय्‍य होत आहे, असे क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या विरोधात आक्षेपार्ह व्‍हिडिओ प्रसारित करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

देवतांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये करणे टाळा. सामाजिक माध्‍यमावर २ धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणार्‍या पोस्‍ट करू नका. अन्‍यथा कठोर कारवाई करण्‍यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.

संभाजीनगर स्‍मार्ट सिटीने विनानिविदाच दिले कोट्यवधींचे काम !

स्‍मार्ट सिटीअंतर्गत १ सहस्र १०० कोटी रुपयांची कामे निविदा पद्धत राबवून कंत्राटदारांना देण्‍यात आली आहेत; मात्र याचवेळी कोट्यवधी रुपयांचे एक काम प्रशासनाने साध्‍या अर्जावर दिले आहे.

सोलापूर, कोल्हापूर विद्यापिठाच्या २ फेब्रुवारीपासून होणार्‍या सर्व परीक्षा स्थगित

वर्ष २०१६ पासून शिक्षकेतर कर्मचारी स्वत:च्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत; मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाविना काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांची हानी होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत होतो.

हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांवर ‘ईडी’ची धाड !

‘गोडसाखर’ साखर कारखान्यामध्ये अवैध १०० कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच ११ जानेवारीला हसन मुश्रीफ यांचे कागल, पुणे येथील निवासस्थान यांच्यावरही धाड टाकण्यात आली होती.

सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ पदफेरी उत्‍साहात !

१५ फेब्रुवारीला जयभवानी प्रशालेचे मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्या निमित्ताने . . .

अभिलेखावरील आरोपीने केलेल्‍या १७ घरफोड्या पोलीस अन्‍वेषणात उघड ! – समीर शेख, सातारा पोलीस अधीक्षक

जिल्‍ह्यात घरफोड्या करणारा अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्‍हेगार संजय अंकुश मदने याने १७ घरफोड्या केल्‍या असल्‍याचे पोलीस अन्‍वेषणात उघड झाले आहे.

ई-गव्‍हर्नन्‍स निर्देशांकात पिंपरी-चिंचवड अग्रस्‍थानी !

सेवा, पारदर्शकता आणि उपलब्‍धता या ३ निकषांवर काढण्‍यात आलेल्‍या राज्‍यातील २७ महापालिकांच्‍या ई-गव्‍हर्नन्‍स (सरकारशी संबंधित सेवांमधील माहिती-तंत्रज्ञानाचा वापर) निर्देशांकात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रथम क्रमांकावर असून पुणे महापालिका मागे गेली आहे.

गुवाहाटी बंडाच्‍या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दूरभाषवरून आशीर्वाद दिला होता !

गुवाहाटी बंडाच्‍या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आम्‍हाला आशीर्वाद दिला होता, असा गौप्‍यस्‍फोट मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केला.

काशी एक्‍सप्रेसच्‍या इंजिनामध्‍ये बिघाड; मध्‍य रेल्‍वेची सेवा विस्‍कळीत !

आसनगावजवळ काशी एक्‍सप्रेसच्‍या इंजिनमध्‍ये बिघाड झाल्‍याने मध्‍य रेल्‍वेच्‍या मार्गावर वाहतूक सेवा पाऊण घंटा कोलमडली होती. त्‍यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्‍वे रुळावरून चालत आसनगाव रेल्‍वे स्‍थानक गाठावे लागले.