काशी एक्‍सप्रेसच्‍या इंजिनामध्‍ये बिघाड; मध्‍य रेल्‍वेची सेवा विस्‍कळीत !

ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – आसनगावजवळ काशी एक्‍सप्रेसच्‍या इंजिनमध्‍ये बिघाड झाल्‍याने सकाळी ८.१५ ते ८.४५ या कालावधीत मध्‍य रेल्‍वेच्‍या मार्गावर वाहतूक सेवा पाऊण घंटा कोलमडली होती. त्‍यामुळे शेकडो प्रवाशांना रेल्‍वे रुळावरून चालत आसनगाव रेल्‍वे स्‍थानक गाठावे लागले.