पुणे – सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या ३ निकषांवर काढण्यात आलेल्या राज्यातील २७ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स (सरकारशी संबंधित सेवांमधील माहिती-तंत्रज्ञानाचा वापर) निर्देशांकात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रथम क्रमांकावर असून पुणे महापालिका मागे गेली आहे. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि सामाजिक माध्यमांतील खात्यांवरील माहितीवर हा निर्देशांक निश्चित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेला १० पैकी ६.२३, तर पुणे महापालिकेला ४.४७ गुण प्राप्त झाले. ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नरचा आढावा घेतला जातो. मीरा-भाईंदर महापालिकेने द्वितीय, तर नाशिक महापालिकेने तृतीय क्रमांक मिळवला. मालेगाव, धुळे, नगर, परभणी, चंद्रपूर, अकोला आणि भिवंडी-निझामपूर महापालिकांची सर्व निकषांवर निकृष्ट कामगिरी असल्याचे निर्देशांकात आढळले.