विद्यार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्रभक्‍ती दृढ करण्‍यात राष्‍ट्रीय छात्रसेनेचे योगदान ! – गिरीश महाजन, क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री

गिरीश महाजन

मुंबई – विद्यार्थी हे देशाचे भविष्‍य आहेत. राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांमध्‍ये एकता, शिस्‍त आणि राष्‍ट्रभक्‍ती दृढ होण्‍यास साहाय्‍य होत आहे, असे क्रीडा आणि युवक कल्‍याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. देहली येथे प्रजासत्ताकदिनाच्‍या संचलनात सहभागी झालेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या १२५ छात्रसेनेच्‍या चमूचा गिरीश महाजन यांनी त्‍यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी सन्‍मान केला. त्‍या वेळी ते बोलत होते.

ते म्‍हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते महाराष्‍ट्राला मिळालेल्‍या प्रतिष्‍ठेच्‍या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद छात्रसेना संचालनालयाने पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान मिळवला आहे. भविष्‍यातही अशीच कामगिरी करावी. शासनाच्‍या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्‍यात येईल.’’