सोलापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ पदफेरी उत्‍साहात !

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या घोषणांनी शहर दुमदुमले !

सोलापूर – १५ फेब्रुवारीला जयभवानी प्रशालेचे मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सभेच्‍या प्रचारार्थ १ फेब्रुवारी या दिवशी पदफेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. सागर चौक येथे ‘वैष्‍णव मारुति देवस्‍थान’चे श्री. रमाकांत खामकर यांनी प्रारंभी धर्मध्‍वजाचे पूजन केले. लक्ष्मी चौक-पोशम्‍मा चौक-शिंदे शाळा-वैष्‍णव मारुति मंदिर मार्गे पंचमुखी मारुति मंदिर येथे फेरीची सांगता झाली. या वेळी ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम् ।’, ‘लाना होगा लान होगा हिंदु राष्‍ट्र लाना होगा’, अशा विविध घोषणांनी सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले.

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ निघालेली पदफेरी आणि सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ
हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या प्रचारार्थ निघालेली पदफेरी आणि सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ

या सभेला मोठ्या संख्‍येने मित्रपरिवारासह उपस्‍थित रहाण्‍याचा निर्धार धर्मप्रेमींनी केला. या वेळी विजय मारुति मंदिराचे श्री. व्‍यंकटेश बब्‍बूर, श्री गणेश मंदिराचे श्री. प्रकाश कोंतम, श्री. विठ्ठल मंदिराचे श्री. राजू कुडक्‍याल, श्री. नंदू जिंतम, श्री. निखिल बेत, श्री. राजू सिरसिलला, पोषममा मंदिराचे श्री. दंडी आणि श्री. नागेश गंजी, परमेश्‍वरी मंदिराचे श्री. शाम बोल्ली आणि श्री. नरेश कोलप्‍याक, श्री. शुभम रोहिटे, वैष्‍णवीदेवी मंदिराचे श्री. गणेश सूनचू, योगेश्‍वर मारुति मंदिराचे श्री. योगेश मिठ्ठा, श्री. शंकर गवनी, गौरी गणेश मंदिराचे श्री. सूरज करडे, वैष्‍णव मारुति मंदिराचे श्री. अंजय्‍या कोलप्‍याक, पंचमूर्ती देवालयाचे श्री. अरुण कोटा आणि श्री. अजय परशी उपस्‍थित होते.

विशेष

१. पंचमूर्ती देवालयाचे विश्‍वस्‍त श्री. अमृतदत्त चींनी यांनी फेरीतील सहभागी धर्मप्रेमींसाठी चहाची व्‍यवस्‍था केली, तसेच पंचमुखी मारुति मंदिर येथे नियमित धार्मिक कार्यक्रम व्‍हावेत, अशी मनीषा व्‍यक्‍त केली.

२. विडी घरकुल येथील धर्मप्रेमी श्री. राहुल तलकोकुल यांनी फेरीत सरबत वाटप केले.

३. फेरीच्‍या मार्गात ठिकठिकाणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी फेरीचे उत्‍स्‍फूर्तपणे स्‍वागत केले, तसेच अनेकजण फेरीत सहभागी झाले.