भिवंडी येथे विनाअनुमती मोर्चा काढल्याप्रकरणी ३७ आंदोलकांवर गुन्हा नोंद !

भिवंडी शहरात वीज वितरण आणि देयक वसूल करणारे ‘टोरेंट पॉवर’ आस्थापन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाविकास संघर्ष समितीने मोर्चा काढला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने भिवंडी पोलिसांनी मोर्च्यास अनुमती नाकारली होती; मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला.

(म्हणे) ‘हिंदु धर्म केव्हा जन्माला आला ? त्याला कुणी जन्माला घातले ?, हाच मोठा प्रश्‍न आहे !’ – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर

ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !

फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे मत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अंबरनाथ येथे वीज मंडळाच्या भरारी पथकातील लाचखोर अधिकार्‍यासह तिघे कह्यात !

वीजचोरी करणार्‍या ग्राहकाचा ३ ते ४ लाख रुपयांचा दंड रहित करणे आणि देयकात तडजोड करून देण्ो यांसाठी ७५ सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या वीज मंडळाच्या भरारी पथकातील लाचखोर अधिकार्‍यासह तिघांना कह्यात घेण्यात आले. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. 

नाशिक येथे लाच घेतांना जी.एस्.टी. अधिकार्‍यांसह ४ जणांना अटक ! 

तक्रारदाराचा विज्ञापन चित्रीकरणाचा व्यवसाय असून त्याचे जी.एस्.टी. भरणे बाकी होते. जी.एस्.टी. अधिकारी जगदीश पाटील यांनी ‘चित्रीकरणाची वाहने ‘जी.एस्.टी.’चा दंड न भरता सोडून देतो’, असे सांगत ४० सहस्र रुपयांची लाच मागितली.

उदयनिधी यांच्या विधानावर उत्तर द्या !  

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ‘उदयनिधी यांच्या विधानावर योग्य उत्तर द्या. ते सहन करू नका’, असा आदेश दिला.

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात लोणीकंद (पुणे) येथे पोलिसांकडून गुन्‍हा नोंद !

नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे २ सप्टेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

फसवणुकीद्वारे हिंदूंचे होणारे धर्मांतर थांबवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

याचिकेद्वारे या संदर्भात केंद्रशासनाला आदेश देण्याची करण्यात आली होती मागणी !

उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खर्गे यांच्या विरोधात कानपूर (उत्तरप्रदेश) येथे गुन्हा नोंद

यावर तात्काळ कारवाई होऊन उदयनिधी आणि खर्गे यांना कारागृहात डांबले पाहिजे !

उत्तराखंडमध्ये २ मुसलमानांनी बंधूंनी हिंदु धर्म स्वीकारला !

या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही भावांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर आनंद व्यक्त केला.