भिवंडी येथे विनाअनुमती मोर्चा काढल्याप्रकरणी ३७ आंदोलकांवर गुन्हा नोंद !

टोरेंट पॉवर आस्थापनाच्या विरोधाचे प्रकरण

ठाणे, ५ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी शहरात वीज वितरण आणि देयक वसूल करणारे ‘टोरेंट पॉवर’ आस्थापन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत महाविकास संघर्ष समितीने मोर्चा काढला. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने भिवंडी पोलिसांनी मोर्च्यास अनुमती नाकारली होती; मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला.

या प्रकरणी महाविकास संघर्ष समितीचे पदाधिकारी माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रूपेश म्हात्रे, माजी आमदार रशीद ताहीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू, कॉम्रेड विजय कांबळे, माजी नगरसेवक मतलुब सरदार, रवीश मोमीन, तुफेल फारुकी यांच्यासह एकूण ३७ जणांविरोधात येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.