(म्हणे) ‘हिंदु धर्म केव्हा जन्माला आला ? त्याला कुणी जन्माला घातले ?, हाच मोठा प्रश्‍न आहे !’ – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर

कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांचे हास्यास्पद विधान !

कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्‍वर

तुमकुरू (कर्नाटक) – जगात अनेक धर्म जन्माला आले आहेत; परंतु हिंदु धर्म केव्हा आणि कसा जन्माला आला, याविषयी मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी केले. ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

परमेश्‍वर पुढे म्हणाले की, बौद्ध आणि जैन धर्म आमच्या देशातच जन्माला आले. बाहेरून इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म आले. मनुष्य कुळाचे भले व्हावे, हाच सर्व धर्मांचा सारांश आहे. (फसवणुकीद्वारे धर्मांतर करणे आणि तलवारीच्या बळावर धर्माचा प्रसार करणारे, मूर्तीपूजकांची मंदिरे पाडणारे आदी अत्याचार करणारे धर्म कुणाचे भले करतात, हाच प्रश्‍न आज जगाला पडला आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म म्हणजे सनातन वेदिक धर्म हा अनादि आणि अनंत आहे. तो अपौरुषिय म्हणजे ईश्‍वरनिर्मित आहे. हे हिंदूच्या धर्मग्रंथांमध्ये लिहिले आहे, तसेच ऋषि, मुनि आणि संत यांनी वेळोवेळी सांगितले आहे. हे स्पष्ट असतांना अशा प्रकारचा प्रश्‍न विचारणारे जी. परमेश्‍वर जाणीवपूर्वक बालीशपणा करत आहेत, असेच लक्षात येते !