मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन धर्मांधाकडून कामगाराची २ लाखांची फसवणूक !

प्रत्येक ठिकाणी हिंदूंना नाहक त्रास देणारे धर्मांध हिंदूंसाठी त्रासदायक ठरत असल्याने त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

कासारवाडी, माजगाव येथे ‘शंभुराजे’ नाटकातून धर्मवीर संभाजी महाराजांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न !

या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली.

आज सांगली येथील ‘सावरकर गौरव यात्रे’त सहभागी होण्याचे आवाहन !

या वेळी शहर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक बाबा शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार हेतूपूर्वक अपमान करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते यांचा निषेध केला.

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या समोरील भागाला तडे !

येथील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे काही भेगा पडल्याचे आढळले आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’चे संवर्धन आणि दुरुस्ती यांसाठी ८ कोटी ९८ लाख २९ सहस्र ५७४ रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी !

जर्मनीमध्ये प्रतिवर्षी विविध कौशल्ये असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित लोकांची कमतरता भासते. जर्मनीची मनुष्यबळाची ही आवश्यकता महाराष्ट्र पूर्ण करू शकतो, अशी अपेक्षा जर्मनीचे वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे व्यक्त केली.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) महावितरण कार्यालयाच्या दारात करवीर शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने !

अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही उंचगावमधील वीज वितरण शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी मार्चचे कारण सांगून वीजवसुली करतांना त्यांची वीज बंद करत होते.

निकाल लवकर घोषित करण्यासाठी उत्तरपत्रिकांची आता ‘ऑनलाईन’ पडताळणी !

परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी वेगाने होऊन निकाल लवकर घोषित करण्यासाठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने घेतला आहे.

श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे दरीत कोसळलेल्या १३ भाविकांना वर काढण्यात यश !

सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या फलटण तालुक्यातील श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेवाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वर नेत असतांना १३ भाविक दरीत कोसळून घायाळ झाले.

रोशनी शिंदे यांची प्रकृती स्थिर ! – डॉ. उमेश आलेगावकर

रोशनी शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसेच त्या गर्भवतीही नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.