माजी आमदार अनुसया खेडकरसह १८ जणांना ५ वर्षे सक्तमजुरी !

माजी आमदार अनुसया खेडकर

नांदेड – ७ जून २००८ या दिवशी शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर आणि त्यांचे पुत्र महेश खेडकर यांच्यासह १७ जणांनी हिंसक आंदोलन करून राज्य परिवहन मंडळाच्या ८ बसगाड्यांची हानी केली होती. या दगडफेकीत अनेक पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस्.ई. बांगर यांनी ११ एप्रिल या दिवशी निकाल देतांना माजी आमदार अनुसया खेडकर यांसह १८ जणांना ५ वर्षे सक्तमुजरी आणि प्रत्येकी १ लाख ६० सहस्र ७५० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा घोषित झाली, तेव्हा अनुसया खेडकर उपस्थित नव्हत्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले. इतर १७ आरोपी न्यायालयात उपस्थित होते.