पुणे येथे लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर ‘ ओडिनो’ या विषाणूची लागण !

‘ओडिनो’हा आजार जीवघेणा नसून आजाराची लक्षणे पूर्णत: निघून जाण्‍यास किमान ७ दिवसांचा अवधी लागतो. हा विषाणू सामान्‍यत: संक्रमित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आल्‍याने पसरत आहे.

इंदापूर (पुणे) येथील अवैध पशूवधगृह उद़्‍ध्‍वस्‍त करावे !

ज्‍या महाराष्‍ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्‍म झाला, त्‍याच महाराष्‍ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची मागणी करण्‍यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्‍जास्‍पद आहे !

सोलापूर येथील सभेत १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

हिंदु राष्ट्र स्थापायचे असेल, तर आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदुसंघटनशक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ही वाढवण्याची आवश्यकता !

पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल !  – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा ‘महाआक्रोश मोर्चा’ !

‘मोर्च्‍याविना सरकारपर्यंत आपले म्‍हणणे पोचणारच नाही’, अशी प्रतिमा सरकारची व्‍हायला नको, यासाठी प्रयत्न व्‍हायला हवेत ! समस्‍या वेळच्‍या वेळी आणि योग्‍य पद्धतीने सोडवाव्‍यात, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

नाशिक महापालिकेच्‍या करवसुली विभागाकडून १५० कोटी रुपयांची वसुली !

कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाही व्‍हायला हवी !
कोट्यवधी रुपयांची वसुली न रहाण्यासाठी काय उपाययोजना काढणार ? हे प्रशासनाने सांगायला हवे !

विज्ञानाला अध्‍यात्‍माची जोड मिळाली की, नव्‍या कल्‍पना उदयाला येतात ! – डॉ. विजय भटकर, संगणक शास्‍त्रज्ञ

पुणे येथील ‘श्री स्‍वामी समर्थ औंध’ पुरस्‍कार वितरण सोहळा ! विज्ञानात प्रत्‍येक गोष्‍ट ही मोजमापात असते; मात्र ज्‍या गोष्‍टी मोजता येत नाहीत, त्‍या गोष्‍टी अध्‍यात्‍मात येतात.

आरोप सिद्ध झाल्‍याने १० कर्मचार्‍यांवर कारवाई !

घोटाळे करणार्‍या १० कर्मचार्‍यांना अन्‍य शिक्षेसह आजन्‍म कारावासाची शिक्षाही केली पाहिजे !

पुणे येथील संत साई हायस्‍कूल येथे पाश्‍चात्त्य संस्‍कृतीला झुगारून ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा !

इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत हिंदु संस्‍कृतीची जोपासना केली जाणे हे स्‍तुत्‍य !

शिक्षक अधिवेशनानिमित्त पुणे जिल्‍ह्यातील एकही प्राथमिक शाळा बंद न ठेवण्‍याचा जिल्‍हा परिषदेचा आदेश !

जिल्‍ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ ‘शिक्षक अधिवेशना’स जाण्‍यासाठी रजा संमत केली जाईल; परंतु एकाच शाळेतील सर्वच शिक्षकांना रजा संमत केली जाणार नाही.