पुणे येथे लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर ‘ ओडिनो’ या विषाणूची लागण !

लहान मुलांना संसर्ग होण्‍याचे प्रमाण वाढले

प्रतिकात्मक चित्र

पुणे – ताप येणे, घसा खवखवणे, डोळे लाल होणे, सर्दी, खोकला, जुलाब होणे या प्रकारचा त्रास लहान मुलांना होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. ही सर्व लक्षणे ‘ओडिनो’ या विषाणूची असून गेल्‍या ३ वर्षांच्‍या तुलनेत यंदा लहान मुलांना या विषाणूचा संसर्ग होण्‍याचे प्रमाण ७० टक्‍क्‍यांनी वाढल्‍याचे निरीक्षण बालरोगतज्ञांनी नोंदवले आहे. १० वर्षांपर्यंतच्‍या मुलांना या विषाणूची लागण होत आहे.

‘ओडिनो’ विषाणूसह सध्‍या लहान मुलांना ‘राईनो’ आणि ‘स्‍वाईन फ्‍ल्‍यू’ (एच् १ एन् १) या विषाणूचाही संसर्ग होत आहे. ‘ओडिनो’हा आजार जीवघेणा नसून आजाराची लक्षणे पूर्णत: निघून जाण्‍यास किमान ७ दिवसांचा अवधी लागतो. हा विषाणू सामान्‍यत: संक्रमित व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आल्‍याने पसरत आहे.