पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत

जमावबंदीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. दिवसा ५, तर रात्री २ कर्मचारी आणि पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

अनावश्यक फिरणार्‍यांच्या ५० हून अधिक दुचाकी पोलिसांकडून कह्यात

शहरातून विनाकारण कुणीही दुचाकीवरून फिरतांना आढळल्यास संबंधितांची दुचाकी शासनाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली आहे.

किराणा दुकानदारांची सूची प्रशासनाकडून सिद्ध ! – माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद

भाजीपाला घरपोच देण्याविषयीही विचार चालू

सोलापूर येथे उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक नसलेल्या ‘सॅनिटायझर’च्या १०० बाटल्या जप्त

येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयाने उत्पादकाचे नाव अन् परवाना क्रमांक नमूद नसलेल्या ‘सॅनिटायझर’च्या १०० बाटल्या जप्त केल्या आहेत.

मालेगाव (जिल्हा नाशिक) येथे एम्.आय.एम्. आमदाराच्या समर्थकाकडून त्यांच्यासमोरच वैद्यकीय कर्मचार्‍यास मारहाण

येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली.

सोलापूर जिल्ह्यातील खासगी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जिल्ह्यात खासगी डॉक्टरांनी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक आहे, तसेच ‘अन्नधान्य आणि भाजीपाला यांचा साठा मुबलक असल्याने एकाच वेळी गर्दी करू नका’, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले….

सहारा (मुंबई) परिसरात साठा करून ठेवलेली मास्कची २०० खोकी पकडली

सहारा येथील एका गोदामामध्ये साठा करून ठेवण्यात आलेली मास्कची २०० खोकी पोलिसांनी पकडली आहेत. सहारा आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही एकत्रितपणे कारवाई केली…..

गुंडेवाडी (जिल्हा जालना) येथे  ३ जणांच्या हातांवर ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यावर कुटुंबियांकडून आरडाओरड

तालुक्यातील गुंडेवाडी येथे २४ मार्च या दिवशी ३ कोरोना संशयित आले होते. त्यांच्या हातांवर मारण्यात आलेले ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यानंतर संबंधितांच्या घरातील लोकांनी आरडाओरड चालू केली….

गोवंशियांची हत्या करणार्‍या टोळीला पोलीस कधी पकडणार ? – भाजपचे आमदार आशिष शेलार

आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई येथे गोवंशियांची हत्या केल्यानंतर आरोपींना नावापुरते पकडले जाते. जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. गोवंशियांची हत्या करणार्‍या टोळीला पोलीस कधी पकडणार ? …           

१४ एप्रिलपर्यंत बंदीची मुदत संपेलच, असे नाही ! – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

यावरून जनतेने लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना कोरोनाविषयी किती गंभीर राहून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे !