गुंडेवाडी (जिल्हा जालना) येथे  ३ जणांच्या हातांवर ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यावर कुटुंबियांकडून आरडाओरड

जालना – तालुक्यातील गुंडेवाडी येथे २४ मार्च या दिवशी ३ कोरोना संशयित आले होते. त्यांच्या हातांवर मारण्यात आलेले ‘क्वारंटाईन’ शिक्के पाहिल्यानंतर संबंधितांच्या घरातील लोकांनी आरडाओरड चालू केली. त्यामुळे गावातील सर्व लोक घाबरले. या प्रकरणाची शासकीय यंत्रणेला माहिती दिल्यानंतर अधिकारी गावात आले; मात्र त्यांना संशयित लोक सापडले नाहीत. त्यानंतर संशयितांचे छायाचित्र आरोग्य प्रशासनाला पाठवण्यात आले. त्यानंतर सापडलेल्या ३ संशयितांना समज देऊन त्यांच्या कुटुंबियांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. गुंडेवाडी गावात बाहेरील गावाचे कुणी येऊ नये, यासाठी गावकर्‍यांनी सर्व रस्ते बंद केले आहेत.