कर्नाटकात मदरशात शिकणार्‍या दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कर्नाटकातील युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या सुरय्या अंजुम यांचा हिजाबची मागणी करणार्‍यांना घरचा अहेर !

धर्म घरी पाळा, शिक्षणात आणू नका ! ‘महाविद्यालयात हिजाब घालून येण्याची अनुमती द्या’, अशी मागणी करणार्‍या काँग्रेसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

धर्मांधांकडून मंजुनाथ नायक या शिक्षकावर प्राणघातक आक्रमण !

येथे हिजाबच्या प्रकरणावरून निदर्शने करतांना दगडफेक करण्यात आल्यानंतर लोखंडी सळीद्वारे हे आक्रमण करण्यात आले. ‘आक्रमण करणार्‍यांना व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या साहाय्याने ओळख पटवून पकडण्यात येईल’, असे पोलीसांनी सांगितले.

भविष्यात भगवा ध्वज ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंग्याचा आदर करायला हवा ! – कर्नाटकमधील मंत्री ईश्‍वरप्पा

भविष्यात भगवा ध्वज हा ‘राष्ट्रध्वज’ बनू शकतो; मात्र सध्या तिरंगा हा आता राष्ट्रध्वज असून त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास अन् पंचायत राज मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी केले.

हिजाबच्या मागे सीएफ्आय आणि एसडीपीआय यांचा राजकीय स्वार्थ ! – भाजपचे आमदार रघुपती भट यांचा आरोप

‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.

हिजाबचे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपिठाकडे !

मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास अनुमती देण्याची मागणी करणार्‍या ४ याचिकांवर सुनावणी करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना ‘अल्ला हू अकबर’ म्हणत विरोध करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीला ५ लाख रुपयांचे पारितोषिक

जर या ठिकाणी हिंदु विद्यार्थिनी असती आणि धर्मांध विद्यार्थी असते, तर त्यांनी या हिंदु मुलीची काय अवस्था केली असती, हे वेगळे सांगायला नको !

 YesToUniform_NoToHijab चा विषय : राज्यघटनेनुसार निर्णय दिला जाईल ! – कर्नाटक उच्च न्यायालय 

उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालय भावनांनुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालणारे आहे. राज्यघटना ही न्यायालयासाठी गीता आहे. जो काही निर्णय होईल, तो सर्व याचिकांना लागू असेल.

Exclusive : शैक्षणिक क्षेत्र ‘पंथनिरपेक्ष’ असल्याने नियमांचे पालन करतांना तडजोड अयोग्यच ! – प्रा. के.जी. सुरेश, कुलगुरु, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विश्‍वविद्यालय, भोपाळ

उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये ‘हिजाब’च्या घटनाबाह्य उपयोगासंदर्भात चालू असलेला वाद !

हिजाब आणि भगवे उपरणे घालून पोचलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ असे म्हणून साहाय्य करणार्‍यांना दंगलीच्या वेळी धर्मांध ते दलित आहेत; म्हणून सोडतात कि ते ‘हिंदू’ आहेत; म्हणून त्यांच्यावर आक्रमण करतात, हे ते सांगतील का ?