Exclusive : शैक्षणिक क्षेत्र ‘पंथनिरपेक्ष’ असल्याने नियमांचे पालन करतांना तडजोड अयोग्यच ! – प्रा. के.जी. सुरेश, कुलगुरु, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विश्‍वविद्यालय, भोपाळ

#YesToUniform_NoToHijab

भोपाळ (मध्यप्रदेश), ८ फेब्रुवारी (वार्ता.) – शाळा, पोलीस दल, सैन्य दल आणि निमलष्करी दल यांमध्ये शिस्त सर्वोच्च महत्त्वाची असते. त्यांचा मानक गणवेश हा या शिस्तीचा एक भाग आहे आणि त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. एखाद्याच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा धार्मिक जीवनात त्याच्या पोशाखाविषयी सरकारला काही म्हणायचे नाही; परंतु शैक्षणिक आणि सरकारी संस्था ही पंथनिरपेक्ष क्षेत्र आहेत अन् तेथे नियमांचे पालन करतांना अधार्मिक वृत्तीमध्ये तडजोड करणे योग्य नाही, असे मत भोपाळ येथील प्रथितयश ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विश्‍वविद्यालया’चे कुलगुरु प्रा. के.जी. सुरेश यांनी व्यक्त केले.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये विद्यार्थिनींनी ‘हिजाब’ परिधान केल्याने मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यावर बोलतांना के.जी. सुरेश यांनी त्यांचा अभिप्राय दिला.


YouTube वर व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/xx_p2pa4t0U

‘सनातन प्रभात’ च्या YouTube Channel ला Subscribe करा : https://www.youtube.com/c/SanatanPrabhatOfficial