कर्नाटकातील महाविद्यालयांतील हिजाबचे प्रकरण
बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाब परिधान करून महाविद्यालयात येण्याची अनुमती मागण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या वेळी उच्च न्यायालयाने म्हटले की, न्यायालय भावनांनुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालणारे आहे. राज्यघटना ही न्यायालयासाठी गीता आहे. जो काही निर्णय होईल, तो सर्व याचिकांना लागू असेल.
१. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे अधिवक्ता देवदत्त कामत म्हणाले की, हिजाब घालणे हा इस्लामी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
२. यावर राज्य सरकारचे महाधिवक्ता म्हणाले की, महाविद्यालयांना गणवेश निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, त्यांनी महाविद्यालयाच्या समितीशी संपर्क साधावा.