देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट : ४ – ५ गाड्यांची हानी

राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !

सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !

तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?

१८० भ्रष्टाचारी देशांच्या सूचीमध्ये भारत ८६ व्या क्रमांकावर !  

भारतात भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होत नाही , ही स्थिती हिंदु राष्ट्रातच पालटली जाईल !

देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !

देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.

हिंसेला प्रवृत्त करणार्‍या दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांवर बंदी घाला ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाला हिंसेसाठी भडकवणे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे; पण केंद्र सरकारने याविषयी काहीच पावले उचलेली नाहीत, असे दिसते’, अशा शब्दांत न्यान्यालयाने अप्रसन्नता व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाकडून तांडव वेब सिरीच्या निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार

वेब सिरीज तांडवचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्याची ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रहित !

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा रहित करण्यात आला आहे. देहलीत झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनचा अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याधिकारी तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करणार !

चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.

देहली महामार्ग रिकामा करा !  

येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.

देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी २६ जणांच्या विरोधात गुन्हे नोंद

केवळ गुन्हे नोंद करून सरकारने थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबवे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !