चरकसूत्र आणि चरकसंहिता यांत सांगितलेली आयुर्वेदाची महती
‘आयुर्वेद म्हणजे दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारा वेद होय.जो आयुष्याचे ज्ञान करवतो, तो आयुर्वेद होय.
‘आयुर्वेद म्हणजे दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारा वेद होय.जो आयुष्याचे ज्ञान करवतो, तो आयुर्वेद होय.
डोळ्यांत खाज येणे : द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.
धर्मार्थकाममोक्ष यांचे साधन ‘सुदृढ देह’ हे असल्यामुळे आरोग्य उत्तम असेल, तरच मानवी जीवनाचे सार्थक होईल. म्हणजे ऐहिक सुखाचे सगळे सोहळे भोगत (कर्मयोगात आयुष्य व्यतीत करणे) ‘मानवाला मोक्ष मिळावा’, हेच धर्माचे उद्दिष्ट आहे.
आयुर्वेदशास्त्र हेच मुळी सृष्टीच्या मूळ स्वरूपाला धरून पंचमहाभूतांच्या गुणावगुणांवरून ठरवून केले आहे. मानवाचे मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विचार त्यात केला आहे.
आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेदात व्यक्तीचा सर्वांगाने म्हणजे तिच्या प्रकृतीचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर विचार केला जातो.
‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.
आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !
‘ईश्वरभक्तीत पूर्ण समर्पित होऊन उपवास करीन आणि त्याच्या सहवासात राहीन’, असा संकल्प करावा.
अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.
अल्कोहोल आणि ब्लॅक टी यांसारख्या पेयांत सूक्ष्म-तम घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मानवावर नकारात्मक परिणाम होऊन त्याच्यातील तामसिकताही वाढते. जितके जास्त प्रमाण, तितका त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो.