चरकसूत्र आणि चरकसंहिता यांत सांगितलेली आयुर्वेदाची महती

१. ‘आयुर्वेद म्हणजे दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारा वेद होय. याची व्याख्या अशी – ‘तत्रायुर्वेदयतीत्यायुर्वेदः …यतश्‍चायुष्याण्यनायुष्याणि च द्रव्यगुणकर्माणी वेदयत्यतोऽप्यायुर्वेदः ।’ म्हणजे जो आयुष्याचे ज्ञान करवतो, तो आयुर्वेद होय. तसेच जो आयुष्याला हितप्रद आणि हानीकारक अशी द्रव्ये, गुण, कर्मे समजावून सांगतो, तो आयुर्वेद होय ! – (चरकसूत्र ३०.३३)

२. हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् । 

मानं च तच्च यत्रोक्तम् आयुर्वेदः स उच्यते ॥ – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १, श्‍लोक ४१

अर्थ : योग्य-अयोग्य, सुख-दुःख यांचा मानवाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, याचे मोजमाप ज्यात सांगितले आहे, त्याला ‘आयुर्वेद’ म्हणतात.